ठोसेघरचा निसर्गराजा साद घालतोय!


सातारा : पावासाची रिमझिम सुरु झाली की पर्यटकांची पावले निसर्गाकडे वळतात. डोंगर दऱ्यातून फषसाळत धो-धो कोसळणारे धबधबे, उभा आडवा पडणारा पाऊस, वनराईने नटलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा व तेथील हिरवागार निसर्ग मनाला मोहून टाकतो. गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या कड्या कपारीतून धो धो कोसळणारे असंख्य धबधबे पर्यटकांना साद घालत आहेत. 

संपूर्ण डोंगर परिसर जणू हिरवाईने नटला आहे. डोंगर दऱ्यात, झाडा झुडपातून धो-धो कासळणारे धबधबे पर्यटकांचे मन मोहून टाकत आहेत. धबधब्याखाली चिंब भिजण्याचा मोह त्यांना झाल्याशिवाय राहत नाही. हे धबधबे म्हणजे जणू दूधगंगाच भूतलावर अवतरल्याचा भास होतो. असाच ठोसेघर नावाचा धबधबा साताऱ्यापासून 27 किलोमीटर अंतरावर आहे. सातारा शहरातून सज्जनगड मार्गे या ठिकाणी जाता येते. या ठिकाणी दोन धबधबे आहेत. यामधील मोठा धबधबा ३५० फुट तर लहान धबधबा २०० फुटवरून कोसळतो. या ठिकाणी पश्चिम घाटात आढळणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांची माहिती देणारे छोटे संग्रहालय तयार करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.