Your Own Digital Platform

तुकोबा पालखी सोहळ्यात विद्रोहींचे आरोग्य शिबीर


सातारा : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात मोफत वारकरी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. भर पावसातही शिबिरात सहभागी डॉक्‍टरांनी केली वारकऱ्यांची तपासणी, या शिबीराच आयोजन विद्रोही सांस्कृतिक चळवळ,सातारा यांनी केले होते.

आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे पाचशे ते सहाशे वारकऱ्यांची तपासणी डॉक्‍टरांनी केली. या शिबिरात डोकेदुखी , अंगदुखी ,सांधेदुखी , पाठदुखी , डोळ्याचे विकार ,स्नायूदुखी , चिखल्या , ताप , थंडी वाजणे खोकला ,सर्दी या आजारावर वारकरयांना औषधें आणि मलम देण्यात आली. वारकऱ्यांची तपासणी डॉ प्रविण झोरे ( कोरेगाव ) , डॉ रविराज दबडे ( जयसिंगपूर ) यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथील आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयाचे ओंकार खांडेकर , पवन शिंदे , गौरव शितोळे, सुमेधा क्षिरसागर , विशाखा पाटील , व मृणाली सत्रे यांनी केली. वारकरयांना तपासून ऊपचार करून औषधे देण्यात आली. आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दरवर्षी वारीत आरोग्य शिबीर आयोजित करावे अशी आशा व्यक्त केली.
जगतगुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. इंदापूर इथं आरोग्य तपासणी शिबीर चार वर्षांपासून आयोजित करण्यात येते. यावर्षी भर पावसातही वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली.

वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यासोबत हुंडा घेणार नाही, देणार नाही, अशी शपथ घेण्यात आली आणि व्यसन आणि हुंडा प्रथे विरोधात फलक लावून समाजप्रबोधन करण्यात आले.आरोग्य शिबिराचे आयोजन विद्रोही सांस्कृतिक चळवळ, सातारा जिल्हा शाखा, मुस्लिम समनवय समिती, इंदापूर ,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,विमा कामगार संघटना, राष्ट्र सेवा दल,इंदापूर यांच्या वतीने करण्यात आले. शिबिर यशस्वी होण्यासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे उपाध्यक्ष विजय मांडके, शंकूतला मांडके, सलीम शेख,युवराज जाधव, मयूर खराडे,लखन जगताप, शुभम कदम, सुजित कदम, संकेत माने, शुभम ढाले, रश्‍मी लोटेकर, अक्रम मणेर, रामा सूर्यवंशी, मनीष करपे, शुभम खरात यांनी परिश्रम घेतले. आरोग्य शिबिरास ईनरव्हिल क्‍लब ऑफ सातारा कॅम्प , तनिष्का ग्रूप संभाजीनगर , सातारा . , वैद्यकीय प्रतिनिधी संघटना , सातारा. वगैरे अनेक जणांनी सहाय्य केले आहे. शिबिरासाठी मदत औषधे तसेच आर्थिक मदत देऊन सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे आभार मानण्यात आले.