विक्रमबाबा पाटणकर यांच्या घरी मंत्री गिरीश बापटांची धावती भेट


पाटण : महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवारी कोल्हापूर हून रेशन दुकानदार यांचा मेळावा आटपून पुण्याला परतत असताना त्यांनी पाटण येथे भेट देऊन पाटण विधानसभा मतदारसंघाचा भाजप कार्यकर्त्यां कडून आढावा घेतला. या बैठकीनंतर मंत्री गिरीश बापट यांनी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते विक्रमबाबा पाटणकर यांच्या निवासस्थानी धावती भेट दिली. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, अध्यक्ष विक्रम पावसकर, महिला आघाडीच्या जिल्हाउपाध्यक्षा आयेशा सय्यद, तालुका अध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, दिपक महाडिक यांची उपस्थिती होती. या भेटीत गिरीश बापट - विक्रमबाबा पाटणकर यांची अर्धा तास कमरा बंद चर्चा झाली. या चर्चेनंतर विक्रमबाबा यांनी निवकणे, चिटेघर, बिबी या धरणग्रस्तांची कैफियत मंत्री गिरीश बापट यांचे समोर मांडली. यावेळी पत्रकारांनी विक्रमबाबा यांच्या भाजप प्रवेशाबाबत गिरीश बापट यांना छेडले असता. केवळ चहा-पानासाठी विक्रमबाबाच्यां घरी आलो. वाट पहा योग्य वेळी योग्य निर्णय होईल येवढेच त्यांनी सांगितले.

सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि पाटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांनी मागील वर्षी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकी वेळी जिल्हापरिषद मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. तेंव्हा पासून विक्रमबाबा यांची भाजप प्रवेशाबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी हि विक्रमबाबा पाटणकर संपर्क साधून आहेत. विक्रमबाबा यांच्या भाजप प्रवेशासाठी माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाउपाध्यक्ष आयेशा सय्यद, तालुका अध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर हे प्रयत्नशील आहेत. अशातच भाजपचे नेते व राज्याचे मंत्री गिरीश बापट यांनी पाटण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पाटणला दिलेली भेट व विक्रमबाबा पाटणकर यांच्या घरी मंत्री गिरीश बापट यांची चहा- पाण्यानिमित्ताने अर्धा तास झालेली कमरा बंद चर्चा झाली.

विक्रमबाबा पाटणकर यांचा भाजप प्रवेशाची सुरुवात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यावेळी पत्रकारांनी विक्रमबाबा यांच्या भाजप प्रवेशाबाबत गिरीश बापट यांना छेडले असता केवळ चहा-पानासाठी विक्रमबाबाच्यां घरी आलो आहे. योग्य वेळी योग्य निर्णय होईल वाट पहा एवढेच त्यांनी यावेळी सांगितले.

No comments

Powered by Blogger.