Your Own Digital Platform

उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात कार्यक्रमांचे आयोजन


सातारा : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.27 जुलै रोजी सातारा शहर शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी दिली.

शिवसेना उपनेते व संपर्क प्रमुख नितीन बानगुडे-पाटील, जिल्हाप्रमुख हर्षद कदम, उपजिल्हाप्रमुख हरिदास जगदाळे यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि.27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नगरपालिका शाळा क्रमांक 1 व 2 प्रतापसिंह हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात येणार आहे. तसेच दुपारी 12 वाजता आर्यंग्ल हॉस्पिटलमध्ये रूग्णांना अन्नदान, दुपारी दिड वाजता रिमांड होम येथे विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात येणार आहे.

 कार्यक्रमास माजी जिल्हाप्रमुख व ज्येष्ठ नेते अण्णा देशपांडे, संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष हैबतराव नलवडे, किसनराव नलवडे मेजर रविंद्र शेळके, दत्ता नलवडे, रमेश बोराटे, गिरीष सावंत, सचिन जगताप, शिवाजीराव इंगवले, सयाजी शिंदे, अलिन काशीद, सागर धोत्रे, सुनील भोसले, संतोष निगडकर, नितीन लेकरी, अक्षय चावरे, महेश पाटील, सुमित नाईक, संग्राम कांबळे, सचिन सुपेकर, श्रीनिवास जाधव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.