Your Own Digital Platform

भ्रष्टाचार उघड होण्याच्या भीतीनेच मॅरेथॉन असोसिएशन बरखास्तीची घाट : सुशांत मोरेसातारा : मॅरेथॉन असोसिएशनच्या अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचाराबाबत सातारकरांच्यावतीने वेळोवेळी आवाज उठवला होता. याबाबत चौकशीही झाली होती. परंतु संबंधितांनी दबाव आणून यंत्रणेकडून क्लीन चीट मिळवली असली तरीही यामधील भ्रष्टाचार उघड होवू नये यासाठीच मॅरेथॉन असोसिएशन धर्मादाय आयुक्ताकडील नोंदणी बरखास्त करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यावर हरकत घेतल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, 2012 मध्ये साताऱयातील डॉक्टर, वकील आणि मान्यवरांनी एकत्र येवून मॅरेथॉन असोसिएशनची नोंदणी केली. त्यानंतर हिल मॅरेथॉनच्या नावाखाली लाखो रुपयांच्या देणग्या, पुरस्कर्ते मिळवले. साताऱयाचे नाव जगाच्या पाठीवर नेण्याचे निमित्त करुन मॅरेथॉनच्या नावाखाली दरवर्षी हजारो सातारकरांना वेठीस धरले जात होते. जे कोणी त्यांच्या विरोधात आवाज उठवत असत त्यांच्यावर साताऱयाचा नावलौकिक वाढवणारे मधील अडथळे तसेच अन्य आरोप केले जात असत. परंतु सातारकरांच्या मदतीने वेळोवेळी असोसिएशनच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवण्यात आला होता. त्यासंदर्भात तक्रारी दाखल केल्या होत्या. परंतु तिथेही संबंधितांकडून दबाव आणून क्लिन चीट मिळवण्यात आली. पंरतु त्यानंतर काही दिवसांपूर्वी मॅरेथॉन असोसिएशनच्यावतीने नोदंणी रद्द करावी यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज देण्यात आला आहे. त्यात संस्थेचे उद्दीष्ठ झाल्याचे कारण देण्यात आले आहे. पंरतु असोसिएशनमधील अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचार उघड होवू नये म्हणून यासाठीच हा घाट घालण्यात आला आहे. सातारकरांच्या सहाकार्याने वारंवार याबाबत पाठपुरावा वास्तव समाजासमोर येईल या भितीने हा घाट घालण्यात आला आहे. 2016-17 च्या ऑडीट रिपोर्टमध्ये 1 कोटी रुपये शैक्षणिक कामासाठी दाखवण्यात आला आहे. परंतु या 1 कोटी मधून जाहीरत, डिझायनिंग, बँनर्स, मंडप, ट्रॉफिज, इव्हेंट, टीशर्ट प्रिटींग वर खर्च करण्यात आला आहे. त्यावरुन मॅरेथॉन असोसिएशनचा अनागोंदी कारभार स्पष्ट होतो, असेही त्यांनी सांगितले. तसेच विविध बँकेतील ठेवी मुदत मोडण्यात आल्या आहेत. संस्थेचा कारभार चांगला असल्याचा दावा करणाऱयांनी अचानक संस्था बरखास्त करण्याचा घाट घातला असा प्रश्न उपस्थित होत असून त्याबाबत हरकत घेतल्याचेही त्यांनी सांगितले.