नगरपालिकेत अनुप शहा 'शतरंज के खिलाडी' ; मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर टाकली सतरंजीफलटण : फलटण नगरपरिषदेत थेट मुख्याधिकारी हे अनेक ठेकेदारांची बोगस बिले काढतात  असा घणाघाती आरोप करून फलटण नगरपरिषदेत  मुख्याधिकारी यांच्या दालनासमोरच सत्ताधारी नगरसेवक अनुप शहा यांनी ठिय्या मांडल्याने पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली असून खरच ठेकेदारांची बोगस बिले काढली का? असा प्रश्न सर्वसामान्य फलटणकरांना पडला आहे. दरम्यान, स्वीकृत नगरसेवक अनुप शहा यांना 'सतरंज के खिलाडी' म्हणून नगरपालिकेच्या वर्तुळात संबोधले जाते आहे.

सत्ताधारी पक्षातून स्वीकृत नगरसेवक असलेले व ठेकेदारांची बोगस बिले काढत असलेचा गेली अनेक दिवस वारंवार  आरोप करून फलटण नगरपरिषद व मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांच्या विरोधात नेहमीच आवाज उठवणारे व आरोप करणारे नगरसेवक अनुप शहा यांनी आता चक्क मुख्याधिकारी यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन केले असून या मुळे ठेकेदारांची बोगस बिले काढली असलेचा आरोपाला मुख्याधिकारी कसे सामोरे जाणार असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

आज गुरुवार दि 12 रोजी सकाळी 11 वाजता च हा ठिय्या मांडल्याने नगरपरिषदेत खळबळ माजली होती या नंतर बोगस काम करणाऱ्यांची बिले ताबडतोब थांबवण्यात येतील असे आश्वासन मिळाले नंतर हे ठिय्या आंदोलन अनुप शहा यांनी मागे घेतले आहे.

No comments

Powered by Blogger.