बरड सबस्टेशनचे जुलै महिन्याचे शेती पंपाचे लाईटचे वेळापत्रक जाहीर

राजुरी : बरड ( ता. फलटण ) सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या थ्री लाईट फिडरचे वेळापत्रक विज वितरण कंपनीने जाहीर केले आहे. 

बरड व मुंजवडी फिडर अंतर्गत येणाऱ्या गावासाठी सोमवार ते गुरुवार रात्री 11:50 ते सकाळी 09:50 तर शुक्रवार ते रविवार सकाळी 10 ते सायं 06 पर्यंत तर आंदरूड व निंबळक फिडर चे सोमवार ते गुरुवार सकाळी 10 ते सायं 06 पर्यंत तर शुक्रवार ते रविवार रात्री 11: 50 ते सकाळी 09:50 पर्यंत राहणार आहे.
सदरचे शेती पंपाचे वेळापत्रक शेतकऱ्यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आले असल्याचे बरड सब डिव्हिजन चे सहायक अभियंता प्रमोद सोनवणे यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.