जेष्ठ पत्रकारांना वय वर्ष ६० नंतर निवृत्ती वेतन


फलटण : अधिस्विकृती धारक जेष्ठ पत्रकारांना वय वर्ष ६० नंतर निवृत्ती वेतन दरमहा रुपये दहा हजार शासनाने द्यावे या मागणीसाठी गेली ३० वर्ष महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी सातत्याने पाठपुरावा करीत होती त्याला शासनाकडून प्रतिसाद मिळाल्या बद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, अर्थमंत्री सुधीर मूनगंटीवार, राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांचे खास अभिनंदन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी चे अध्यक्ष व राज्य अधिस्वीकृती समितीचे जेष्ठ सदस्य रवींद्र बेडकिहाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रसिद्धीला दिलेल्या या पत्रकात नमूद करण्यात आले आहे कि, ६ जानेवारी १९८७ ला महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीची स्थापना झाली तेव्हा पासून जेष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन मिळावे या साठी संस्थेने प्रयत्न सुरु केले होते. तत्कालीन मुखमंत्री शरद पवार, शंकरराव चव्हाण, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांचे कडे ही योजना कशी असावी तसेच अन्य राज्यातील या योजने बद्दलची माहिती शासनाला सादर केली होती. तत्कालीन माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे,श्रीमती.फौजिया खान,यांनी संस्थेच्या पोंभुर्ले ता.देवगड जि.सिंधुदुर्ग येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या दर्पण पुरस्कार वितरण कार्यक्रमात या मागणी बद्दल सकारात्मक भूमिका घेतली होती.त्या नंतर या दोघांसह तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत त्यांनी अर्थ खात्याला तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले परंतु तेव्हा पासून अर्थ खाते पेन्शन या शब्दा मुळे या योजनेसाठी अनुकूल नव्हते.

राज्य अधिस्वीकृती समिती च्या नागपूर येथील पहिल्याच बैठकीत पेन्शन शब्दा ऐवजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर जेष्ठ पत्रकार सन्मान योजना या नावाने शासनाकडे प्रस्ताव सादर करावा अशी सूचना जेष्ठ सदस्य रवींद्र बेडकिहाळ यांनी मांडली समिती अध्यक्ष यदु जोशी व संचालक शिवाजीराव मानकर यांनी त्यास तत्वतः मान्यता दिली त्या नंतर या दोघांनी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या बद्दल सविस्तर माहिती दिली याला मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन महासंचालक माहिती व जनसंपर्क ब्रिजेश सिंह यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर जेष्ठ पत्रकार सन्मान योजना या नावाने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले त्या नंतर अधिस्वीकृती समिती च्या दिल्ली येथील बैठकीनंतर महासंचालक यांच्याशी सविस्तर चर्चा होऊन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कडे यदु जोशी यांनी पाठपुरावा करून अर्थ खात्याचा सकारात्मक प्रतिसाद मिळविला. विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचेही संस्थेने या प्रश्नी लक्ष वेधले असता त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्याकडे या योजनेबाबत शिफारस केली होती.

तथापि वारंवार आश्वासने देऊन सुद्धा संबंधित विभागाकडून या प्रस्तावावर कार्यवाही होत नव्हती अनेक वयोवृद्ध पत्रकारांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी कडे वारंवार ठोस कार्यवाही करावी असा आग्रह धरला शेवटी संथेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ,कार्यकारी विश्वस्त विजय मांडके,उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव,कृष्णा शेवडीकर,महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सह.संघाचे उपाध्यक्ष आर. वाय जाबा,रमेश खोत यांनी शासनाला राज्यातील वयोवृद्ध पत्रकारांसह विधिमंडळां समोर धरणे आंदोलनाचा दिनांक २२ जानेवारी २०१८ च्या पत्रान्वये दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ रोजी आंदोलनाचा इशारा दिला त्याची तातडीने शासनाने दखल घेऊन धरणे आंदोलन करू नये अशी विनंती करून या योजनेची कार्यवाही सुरु असल्याचे संस्थेला २३ फेब्रुवारी २०१८ रोजी कळविले.

या आधी संस्थेने या योजनेची सर्व वस्तुस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविस्तर निवेदनाद्वारे कळविल्यावर दिनांक ११/०८/२०१६ रोजी पंतप्रधान कार्यालया कडून याची दखल घेऊन या योजनेतील त्रुटींची पूर्तता लवकर पूर्ण करून या योजनेच्या कार्यवाही बाबत महाराष्ट्र शासनाला सूचित केले होते.

या सर्व पाठपुराव्यामुळे व दबावामुळे शासनाने या योजनेची घोषणा करून सध्याच्या नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी पुरवणी अर्थसंकल्पात रुपये १५ कोटींची तरतूद केली आहे. आता त्वरित लाभार्थी पत्रकारांचे निकष तयार करून १ ऑगस्ट २०१८ लोकमान्य टिळक पुण्यतिथी पासून ही योजना शासनाने सन्मान पूर्वक सुरु करावी अशी मागणी ही रवींद्र बेडकिहाळ यांनी या पत्रकात केली आहे.No comments

Powered by Blogger.