Your Own Digital Platform

फलटण पालखी तळावर राष्ट्रवादी करणार स्वच्छता; सर्वांनी सहभागी व्हावेफलटण: संतश्रेष्ठ ज्ञानेेश्‍वर माऊली पालखी सोहळ्याच्या येथील वास्तव्यानंतर पालखी तळाच्या स्वच्छतेसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध संस्था व्यक्तींच्या सहभागाने गुरुवार दि. 19 रोजी सकाळी 8.30 वाजता विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी केले आहे.

या मोहिमेत फलटण एज्युकेशन सोसायटी, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस, श्रीमंत सईबाई महाराज महिला सहकारी पतसंस्था, फलटण नगरपरिषद, फलटण पंचायत समिती, नाईक निंबाळकर देवस्थान व इतर चॅरिटीज ट्रस्ट, कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदी संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते सहभागी होऊन संपूर्ण पालखी तळाची  स्वच्छता प्रतीवर्षाप्रमाणे करणार असल्याचे निदर्शनास आणून देत यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी केले आहे.