अकरावी प्रवेशाची दुसरी ‘कट ऑफ’ उद्या


सातारा : सातारा शहरातील महाविद्यालयां-मध्ये अकरावी प्रवेशाच्या दुसर्‍या कट ऑफ लिस्टमध्ये सायन्स शाखेसाठी सायन्स कॉलेजला खुल्या प्रवर्गासाठी 86.40टक्के तर सयाजीराव विद्यालयात 96.40 टक्क्यापर्यंत, लाला बहादुर शास्त्री महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी दुसर्‍या गुणवत्ता यादीसाठी 75 टक्के मेरीट लागले आहे. विज्ञान शाखेत टफ फाईट असल्याने कॉमर्स शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. सयाजीरावमध्ये वाणिज्यसाठी 85.20 टक्के मेरीट लागले असून कला शाखेसाठी मागेल त्याला प्रवेश दिला जाणार आहे. सातारा जिल्ह्यात 40हजार 241 विद्यार्थी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. शहरातील कॉलेजमध्ये दाखल झालेल्या अर्जांची छाननी करून गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार पहिली गुणवत्ता यादी दि. 3 रोजी प्रसिध्द झाली होती. पहिल्या गुणवत्तायादीमधील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवार दि. 9 रोजी दुसरी कट ऑफ लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे. विज्ञान शाखेसाठी हाय मेरीट राहिल्यामुळे बर्‍याचशा विद्यार्थी व पालकांची निराशा झाली. दुसर्‍या गुणवत्ता यादीत जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया 9 जुलै रोजी सुरु राहणार असून याच दिवशी दुपारी 3 वा. विनाअनुदानित तुकड्यांसाठी गुणवत्ता यादी लावण्यात येणार आहे.

सातारा शहरातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची दुसरी गुणवत्ता यादीत खुल्या गटासाठी 86.40 टक्केचे मेरीट लागले आहे. एससीसाठी 62, व्हीजेए 72.60, एनटीबी 65.80, एनटीसी 80.60, एसबीसी 62.40, स्पोर्टस खुला 82.80, ओबीसी 65.40, एनटीसी 1.60, माजी सैनिक ओपन 86, ओबीसी 64 टक्के मेरीट लागले आहे.

महाराजा सयाजीराव विद्यालयात विज्ञान शाखेसाठी खुला 96.40, एस.सी. 92.60, एसटी 80, एनटीबी 92.60, एनटीसी. 94.80, एनटीडी 87, एसबीसी 93.20, ओबीसी 94.80, माजी सैनिक ओपन 93, परिसर शाळा ओपन 95.40, परिसर शाळा ओबीसी 90.40, वाणिज्य शाखेसाठी खुला वर्गासाठी 85.20, एससी 79.20, एसटी 67.40, एनटीए 73.40, एनटीबी 82.40, एनटीसी 85.20, ओबीसी 76.40, एसबीसी 82.20 कला शाखेसाठी खुला वर्गासाठी 55, एससी 52.60, एनटीए 49, एनटीबी 62.60, एनटीसी 46.20 असे मेरीट लागले आहे.

लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेसाठी खुल्या वर्गासाठी 72.80, एसटी 45.80, एनटीए 62.60, एनटीबी 64.80, एनटीसी 60.40, ओबीसी 57 टक्के असे मेरीट दुसर्‍या कट ऑफसाठी लागले आहे. सातारा शहरातील विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे ओढा जास्त असून ज्यांना विज्ञान शाखेला प्रवेश मिळाला नाही त्यांना अन्य शाखेचा पर्याय निवडावा लागणार आहे. शहरातील महाविद्यालयांमध्ये दुसर्‍या लिस्टमधील विद्यार्थ्यांंची प्रवेश प्रक्रिया दि. 9 व 10 रोजी राबवली जाणार आहे.

No comments

Powered by Blogger.