"जैसे थे".. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा आदेश


पाटण : जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती व पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमसिंह बाळासाहेब पाटणकर ( विक्रमबाबा ) यांच्या विरूध्द बाजार समितीच्या सभापती संदर्भात झालेला अविश्वास ठराव महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी रद्द करून पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विक्रमबाबाच "जैसे थे"... असा आदेश दिला.

पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे वर्चस्व होते. या बाजार समितीचे सभापती म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांची वर्णी लागली होती. मात्र सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर कामकाज करत असल्याने सर्व संचालक सदस्यांनी

विक्रमबाबा पाटणकर यांचे विरूध्द दि. २१/ १२/ २०१७ च्या विशेष सभेत अविश्वास ठराव एकमताने मंजूर केला होता. या ठरावाच्या विरोधात विक्रमबाबा पाटणकर यांनी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे येथे अपील दाखल केले होते. या अपीलात पण विक्रमबाबा पाटणकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बेकायदेशीर ठरवून विक्रमबाबा पाटणकर हेच सभापती पदी राहतील असा आदेश दि. १५/ ०६/ २०१८ रोजी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिला होता. या आदेशानंतर देखील पुन्हा नव्याने विक्रमबाबा पाटणकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची शक्यता होती. 

या प्रस्ताव दाखल अपील वर कोणतेही कारवाई होऊ नये यासाठी सहकार मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या समोर पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा, जिल्हाधिकारी सातारा, सहायक निबंधक सहकारी संस्था पाटण, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती मर्या. पाटण व संचालक मंडळासह असे १९ जणांविरोधात अपीला सोबत स्थगिती अर्ज दिला होता. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी हा स्थगिती अर्ज मंजूर करून पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद

"जैसे थे" ठेवण्याचे आदेश दिले आहेत

या आदेशानंतर विक्रमबाबा पाटणकर यांच्या समर्थकांच्यात आनंदाचे वातावरण असून विक्रमबाबा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments

Powered by Blogger.