व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर युवतीचा फोटो टाकून अश्‍लील कॉमेंट


सातारा : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर एका युवतीचा वॉटर पार्कमधील फोटो पोस्ट करून त्यावर अश्‍लील कॉमेंट टाकून मनास लज्जा उत्पन्‍न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी सहा युवकांवर सायबर अ‍ॅक्ट व विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहेे. दरम्यान, ‘कट्टर बॉईज राजेवाडी’ या ग्रुपवर हा प्रकार झाला असल्याचे समोर आले आहे.शुभम सुरेश जाधव (वय 23), स्वप्निल नामदेव जाधव (वय 20), राहुल शंकर जाधव (वय 25), आकाश मधुकर जाधव (वय 24), वैभव शंकर जाधव (वय 23, सर्व रा. राजेवाडी, ता. सातारा) व मीलन घाडगे (रा. डिस्कळ, ता. खटाव) या युवकांवर गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी एका युवतीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित सर्व संशयित यांचा व्हॉट्सअ‍ॅपवर ‘कट्टर बॉईज राजेवाडी’ या नावाचा ग्रुप आहे. या ग्रुपवर एका संशयिताने दि. 30 जून रोजी एका युवतीचा फोटो पोस्ट केला. हा फोटोे युवती वॉटर पार्क येथील पोहतानाचा आहे. संशयितांनी त्या फोटोखाली अश्‍लील कॉमेंट केल्या आहेत. याबाबतची माहिती युवतीच्या एका नातेवाईकाला समजल्यानंतर त्यांनी त्याची माहिती घरामध्ये दिली.

संबंधित ग्रुपवरील फोटोखालील कॉमेंटचे स्नॅपशॉट मिळाल्यानंतर युवतीने पोलिस ठाण्यात धाव घेतली व घडलेल्या घटनेची माहिती पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी सर्व माहिती घेतल्यानंतर संशयित सहा युवकांविरुद्ध सायबर अ‍ॅक्टअन्वये व विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

No comments

Powered by Blogger.