Your Own Digital Platform

लोणंद-सालपे घाटात कंटेनर अडकला
लोणंद : लोणंद-सालपे घाटातून निघालेला एक कंटेनर गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास एका अवघड वळणावर वळण घेताना अडकला. सुदैवाने अपघात न घडल्याने कोणतीही हानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली आहे.

मालवाहू करणारा कंटेनर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सालपे घाटातून निघाला होता. निम्मा घाट संपल्यानंतर एका अवघड वळणावर आल्यानंतर वळणाचा अंदाज न आल्याने कंटेनर घाटातच अडकला. 

हे वळण अतिशय रुंद असल्यामुळे घाटातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही बाजुंची वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. थोड्याफार प्रयत्नानंतर अडकलेल्या कंटेनरच्या एका बाजून दुचाकी आणि चारचाकी वाहने कशीबशी जाण्या इतपत जागा करण्यात आली आहे. मात्र, कंटेनर काढण्यात आलेला नाही. रात्री उशिरापर्यंत कोणतीच मदत न मिळाल्यामुळे कंटेनर घाटातच जसाच्या तसा घाटात अडकलेल्या अवस्थेत होता.