Your Own Digital Platform

पोलिसांना एमएससीआयटी बंधनकारकओझर्डे : सातारा जिल्ह्यात 30 हून अधिक पोलिस ठाणे आहेत. यामध्ये 3 हजाराहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे. या सर्वांना शासनाने एमएससीआयटी हा कोर्स करणे आता बंधनकारक केले आहे. जे अधिकारी किंवा कर्मचारी हा कोर्स करणार नाहीत त्यांची बढती आणि जुलै महिन्यात होणारी वार्षिक पगारवाढ रोखण्यात येणार आहे. यामुळे पोलिसदादांची एमएससीआयटीत प्रवेश घेण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्ह्यातील 30 हून अधिक पोलिस ठाण्यांमध्ये 3 हजाराहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये ज्यांचे वय 50 आणि वाहन चालक या दोघांना वगळून इतर सर्वांना संगणक हताळण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनी एमएससीआयटी हा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे या महिन्यात परिक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र पोलिस मुख्यालयात दाखल करावयाचे आहे. हा कोर्स शासनाने बंधनकारक करुन तसे परिपत्रकच काढले आहे. याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुखांना दिले आहे.

या आदेशामुळे पोलिस दलांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सध्या राज्यात ऑनलाईन पोलिस ठाणे ही संकल्पना राबवली जात आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाईन तक्रारी करता येतात. याचबरोबर अनेक विषयांची देवाण घेवाणही संगणकावरच होते. त्यामुळे पोलिस दलातील कारभार वेगवान व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सद्य स्थितीत जे कोणी पोलिस अधिकारी वा कर्मचारी नागरिकांच्या तक्रारी घेत असतात त्यातील बहुतांश पोलिसदादांना संगणक हताळण्याचा अनुभव नसल्याने अडचणी येतात.

जिल्ह्यातील अनेक पोलिस अधिकारीही संगणक प्रशिक्षित नसल्यानेही त्यांच्या वरिष्ठांना महत्वाच्या विषयांची देवाण घेवाण करण्यासाठी अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांना संगणक हाताळण्याचा अनुभव नसल्याचा गैरफायदा घेऊन फक्‍त दिवस भरण्याचे काम करत आहेत. ही बाब अनेकदा निदर्शनास आली आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांकडे एमएससीआयटीचे प्रमाणपत्र नसल्याने हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू ओ. यासाठी प्रवेश घेण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश केंद्रे फुल्‍ल झाली आहेत. प्रमाणपत्र नसल्याने बढती आणि पगारवाढ रोखली जाणार नसल्याने पोलिसांनी धास्ती घेतली आहे. पोलिस ठाण्यातील अपुरे मनुष्य बळ त्या मुळे वाढता कामांचा ताण खचलेले मनोधैर्य आणि त्यात एमएससीआयटीची भर पडल्याने पोलिसांच्या नाकी नऊ येणार असल्याचे दिसत आहे.