नवतरूण मंडळाच्या वतीने वह्या वाटप


पाटण : पाटण तालुक्यातील रूवले( नेहरू टेकडी) येथील बाळगोपाळ नवतरूण मिञ मंडळ,

याच्या वतीने वाडीतील शालेय विद्यार्थ्यांना वहया वाटप करण्यात आल्या. सदर कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे कार्यकर्ते श्री विकास साळुंखे,श्री विनायक साळुंखे,लखन साळुंखे,शरद साळुंखे,सूरज कोतावडे,अजय मोजर,अमोल यादव यांनी केले होते.

अत्यंत गरीब असलेल्या पंरतू शिक्षणामध्ये आवड असलेल्या विद्यार्थाची गुणवत्ता केवळ आर्थिक परिस्थितीमुळे नष्ट होवू नये यासाठी श्री बाळगोपाळ नवतरूण मिञ मंडळाने वतीने हा सामाजिक उपक्रम चालु केला असल्याचे अमोल यादव यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.