भात लागवडीत शेतकरी मग्न


कुडाळ  : महाबळेश्वर तालुक्यातील कोयना कांदाटी खोऱ्यातील खरोशी रेनोशो दुर्गम भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पोटाची खळगी व वर्षभरचा उदर निर्वाह होण्यासाठी वीतभर शेतीमध्ये येथील मुख्य पीक भात लागवडीत सध्या येथील शेतकरी मग्न आहेत.

बळीराजाच्या थकलेल्या हाताला थोडासा हातभार लावावा आणि थकल्या बळीराजाच्या पाठीवर कोणीतरी शाब्बासकीची थाप द्यावी यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागाचा दौरा करण्यासाठी आमची टीम पुढारी टीमने एका शेतकऱ्याच्या भात शिवारात त्यांची दुःख जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. आमच्या सातारा कुडाळ प्रतिनिधी यांनी घेतलेला हा शेतकरी राजाच्या बातमीचा आढावा

No comments

Powered by Blogger.