भाविक भक्तांच्या सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तरडगांव यंत्रणा सज्ज


आरडगांव : माउलींचा पालखी सोहळा शुक्रवार दिनांक १३ रोजी लोणंद मुक्कामी येत असून प्राथमिक आरोग्य केंद्रात तरडगाव यांच्यावतीने वारकरी व भाविक भक्तांच्या सेवेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. अशी माहिती तरडगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल कदम यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.

 यामध्ये प्राथमिक केंद्रात तरडगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल कदम यांनी पालखी सोहळा स्वागताची तयारी केली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास येणाऱया सर्व भाविकांना शुद्ध व पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करण्यासाठी पालखी मार्गावरील ८१ विहिरी हातपंप १९फिलिंग पॉइंट ४असून त्या ठिकाणी दिनांक ११जुलै २०१८पासून सर्व स्तोत्राचेपाणी शुद्धीकरण करण्यात सुरुवात केली आहे. 

त्यासाठी लागणारी कर्मचारी सुद्धा उपलब्ध केलेले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र तरडगाव येथे दोन वैद्यकीय पथके असून एक पथक प्राथमिक आरोग्य केंद्रात तर दुसरे प्राथमिक जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत आहे. त्यासाठी लागणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध आहेत. तरडगाव आरोग्य केंद्र महामार्गावर दहा गावे असून त्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

हॉटेल व्यावसायिकांना हॉटेल स्वच्छतेबाबत तसेच अन्न पदार्थ जाळीत झाकून ठेवण्याबाबत व शुद्धीकरण केलेले पाणी पिण्यासाठी वापरण्यास सक्त सूचना दिल्या गेल्या आहेत. टायर दुकानदार यांना नष्ट झालेली जुने टायर याची विल्हेवाट लावण्यासाठी सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तरडगाव पालखीतळ या ठिकाणी शूट फवारणी शुक्रवारी करणेत येणार आहे .भाविक भक्तांना पालखी काळात कोणतेही प्रकारची आरोग्यविषयक अडचण येणार नाही याबाबतीत दखल घेतली गेली आहे.

 प्राथमिक आरोग्य केंद्रात तरडगाव प्रशासन भाविक - भक्तांच्या सेवेसाठी सज्ज असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल कदम यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.