जिल्ह्यात पाऊसाचे झिंगाट तर माण मध्ये नुसतेच बुरंगाट


म्हसवड : सातारा जिल्ह्यासह जवळपास संपुर्ण राज्यात पाऊस धो - धो बरसत असल्याचे चित्र असुन अनेक ठिकाणी पाऊसाने जनजिवन विस्कळीत झाल्याच्या बातम्या आपण पाहत आहोत, सातारा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस बरसत आहे याच सातारा जिल्ह्यातील महाब्ळेश्वर, पाचगणी, कोयनानगर आदी भागात दररोज पाऊस झिंगाट होवुन धो -धो कोसळत आहे मात्र याच जिल्ह्यातील माण तालुक्यात हा पाऊस बुरंगाट बनत असल्याने जिल्ह्यात पाऊसाचे झिंगाट तर माण मध्ये नुसतेच बुरंगाट असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. 

माण तालुका म्हटले की कायम दुष्काळी भाग म्हणुन ओळखला जातो येथे कधीतरी पाऊस मनसोक्त हजेरी लावतो मात्र हा तालुका ज्या सातारा जिल्ह्यात येतो त्याच जिल्ह्यातील पश्चिमेला हाच पाऊस धुवाधारपणे कोसळत असतो त्यामुळे एकाच जिल्ह्यात पाऊसाचा हा विरोधाभास येथेच पहावयास मिळतो, जिल्ह्यातील काही नद्यांना दरवर्षी पुर येतो तर या तालुक्याची अस्मिता म्हणुन ओळखली जाणारी माणगंगा नदी बारमाही कोरडी असल्याचे चित्र असते पाऊसाळ्यात तरी ही नदी वाहती रहावी यासाठी येथिल शेतकरीवर्ग या नदीपात्रात उरमोडीचे पाणी सोडावे म्हणुन शासन दरबारी टाहो फोडत आहे, मात्र शेतकर्यांचा हा टाहो शासनाला व येथिल राजकर्त्यांना ऐकु येत नसल्याची वस्तुस्थिती आहे, खरेतर उरमोडीचे अतिरीक्त झालेले पाणी हे दरवर्षी दुष्काळी व टंचाई भागांसाठी सोडले जाते त्यासाठी काही ठरावीक रक्कम ही विजबीलापोटी त्या त्या भागातील शेतकर्यांकडुन वसुल केली जाते या पाण्यामुळे नदीकाठच्या शेतकर्यांना मोठा दिलासा मिळत असल्याने हे पाणी माणगंगा नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत यावे यासाठी माणच्या पुर्व भागातील शेतकरी आग्रही आहेत हे पाणी लवकरात लवकर म्हसवड परिसरात पोहचावे यासाठी या भागातील विविध गावातील शेकडो शेतकर्यांनी एकत्र येत नुकतेच म्हसवड शहरात रास्ता रोको आंदोलनही केले त्यावेळी खरेतर या आंदोलनाला सामोरे जाताना उरमोडीच्या अधिकार्यांनी शेतकर्यांकडे पाणी हवे असेल तर विजबीलापोटी किमान रक्कम अँडव्हान्स म्हणुन भरावी अशी अट्ट घालुन त्यासाठी गँरेंटर म्हणुन म्हसवड पालिकेने हमीपत्र देण्याचा आग्रह धरला होता, पाण्यासाठी कायपण म्हणत येथिल शेतकर्यांनी काही रक्कमही गोळा केली तर शेतकर्यांचा हा उत्साह पाहुन म्हसवड नगरपरिषदेनेही काही नगरसेवकांचा विरोध असतानाही तो विरोध मोडीत काढुन संबधीत अधिकार्यांना हमीपत्र देवु केले, मात्र नेहमीच माण तालुक्यात पाण्यावरुन राजकारण सुरु असल्याने या पाण्याचे श्रेय घेण्यावरुन यामध्ये राजकारण सुरु केल्याने या खात्याच्या अधिकार्यांकडुन शेतकर्यांचे पैसे भरुन घेण्यास चालढकल सुरु केल्याने म्हसवड शहराच्या सिमेपर्यंत पोहचलेले पाणी थांबले गेले आतातर ते पाणी बंद केले असल्याची माहिती समोर येत असुन यामुळे म्हसवड पर्यंत उरमोडीचे पाणी पोहण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. 

अगोदरच निसर्गाने या भागावर अन्याय केलाच आहे पण तात्पुरते मिळणारे व शेतकर्यांचा आधारवड ठरणारे पाणीही काही मतलबी राजकारण्यांमुळे बंद झाल्याचे ऐकुन शेतकरी वर्ग पुरता हवालदिल झाला असुन निसर्ग दरवर्षी येथील जनतेची परिक्षा घेतो आता याच जनतेचे कैवारी म्हणवणारे नेतेही सर्वसामान्य जनतेची पाण्यासाठी परिक्षा घेवु लागल्याने सामान्य जनतेतुन नेतेमंडळींबद्दल तीव्र रोष व्यक्त होवु लागल्याची वस्तुस्थिती आहे, पाण्याचे श्रेय कोणीही घ्या पण आम्हाला फक्त आमच्याच पैशातुन पाणी द्या एवढी माफक अपेक्षा या भागातील शेतकर्यांतुन व्यक्त केली जात आहे. तर यंदा निसर्गाने माण तालुक्यावर कृपादृष्टी दाखवुन येथे मनसोक्त हजेरी लावत माणगंगा नदी दुधडी भरुन वाहवी यासाठी सर्वसामान्य बळीराजा देवाला साकडे घालत आहे.

 टेंभुच्या पाण्यासाठी सांगलीकर एकत्र। 

उरमोडी योजनेप्रमाणेच टेंभु योजनेचे पाणी सांगली जिल्ह्यात सोडले जावे यासाठी सांगलीतील सर्व पक्षाचे नेते एकत्र येवुन या पाण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे परंतु उरमोडीच्या पाण्यासाठी माणमधील नेतेमंडळी अशी कधी एकत्र येताना दिसत नाही मात्र याच पाण्याचे श्रेय घेण्यासाठी ही मंडळी पुढे असते.

उरमोडीच्या लाभ क्षेत्रात म्हसवड आहे की नाही हेच अधिकार्यांना माहिती नाही

उरमोडी योजनेचे अतिरीक्त पाणी दुष्काळी भागाला मिळावे यासाठी हे पाणी सोडले जाते परंतु ते पाणी योजनेच्या बाधीत क्षेत्रालाच सोडले जाते म्हसवड शहराच्या दक्षीणेचा भाग हा बाधीत क्षेत्रात येतो आजही येथील अनेक शेतकर्यांच्या सातबार्यावर उरमोडीचे शिक्के दिसुन येतात तरीही अधिकारी म्हणतात की तुमचे क्षेत्र यात येत नाही.

उरमोडीच्या पाण्यामुळे माण मधील शेतकर्यांना खरीपाचा फायदा ।

माणगंगा नदीपात्रात उरमोडीचे पाणी जर आले तर येथिल शेतकर्यांना खरीपाचीे पिके घेता येतील व प्रामुख्याने नगदी पिक असणार्या हळवा कांद्याची लागवड करता येणार असल्याने या परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येवुन शेतकरीवर्गाला मोठ्या प्रमाणावर अर्थिक फायदा होवु शकतो.

No comments

Powered by Blogger.