अल्पवयीन मुलीवर अत्याचार; ग्रामस्थांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा


भिलार(महाबळेश्वर) : 
उंबरी ता.महाबळेश्वर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पोलीस पाटील संतोष उंबरकर याच्या कृत्याचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. अत्याचाराच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी याअशी मागणी करत उंबरीच्या महिला व ग्रामस्थांनी मोर्चा काढला.

पांचगणी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिस पाटील संतोष उंबरकरवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. यावेळी उंबरी गावातील महिला व ग्रामस्थांनी सकाळपासून पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती. विविध संस्था,पक्षाचे नेते ,पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.