Your Own Digital Platform

चक्काजाम आंदोलनापूर्वीच स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात


कराड : तीन दिवसाच्या आंदोलनानंतरही राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका न घेतल्याने कराड तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांनी चक्काजाम आंदोलनाची हाक दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी सकाळी स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांना कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. घरातून ताब्यात घेत पोलिसांनी नलवडे यांना पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे.

वाठार, करवडी, केसे यासह कराड तालुक्यातील विविध भागात गेल्या तीन दिवसांपासून दूध संकलन जवळपास पूर्णपणे ठप्प झाल्यासारखी स्थिती आहे. मंगळवारी रात्री वाठार येथे शेतकऱ्यांनी आक्रमक होत रस्त्यावर दूध ओतले होते. तर करवडीत शेतकऱ्यांनी दुधाने आंघोळ करून शासनाचा निषेध नोंदवला होता. त्यामुळे आता तालुक्यात आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे