Your Own Digital Platform

नायगावात महात्मा फुलेंना अभिवादन


दुधेबावी :
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे गाव असलेल्या नायगावात महात्मा फुले यांनी 15 जुलै 1849 रोजी शाळा सुरू केली होती. या संस्मरणीय दिनानिमित्त सूजन फाउंडेशनच्या वतीने फुले दाम्पत्याच्या अर्धपुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात काम केलेल्यांना पुरस्कार देवून गौरवण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दहिवडीच्या नगराध्यक्षा सौ. साधना गुंडगे होत्या. सामाजिक कार्यकर्ते समीर धाडगे सोपानराव झगडे, अशोक गार्डे, संपतराव जाधव यांची उपस्थिती होते. याप्रसंगी नगराध्यक्षा साधना गुंडगे म्हणाल्या, ज्याप्रमाणे सवित्रीबाईना क्रांतिकार्य करण्याचे बळ, शिक्षण, प्रोत्साहन जोतिबांनी दिले, त्याप्रमाणे पुरुषांनी महिलांना स्वातंत्र्य, प्रोत्साहन व खंबीर साथ दिली पाहिजे.संपतराव जाधव यांनी महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याची व महात्मा फुले विचार अभियानाच्या उपक्रमांची माहिती दिली. अशोक गार्डे मुंबई व समीर धाडगे यांनी मनोगत व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे यांना महात्मा फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सौ. शारदा कोथींबीरे, सौ. संगीता सत्वधर परभणी, सौ साधना गुंडगे, सौ. मंजिरी धाडगे, सौ. संगीता राऊत, सौ. रुक्‍मिणी झगडे, सौ. वंदना पाउलबुद्धे, या विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अनिल कुदळे, राहुल जाधव, सूर्यकांत नेवसे, सौ. रुपाली नेवसे, सौ. पूनम नेवसे, विशाल नेवसे व नायगाव ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन अजित जाधव यांनी केले. सुजन फाऊंडेशन पदाधिकारी किशोर ननावरे यांनी आभार मानले.