Your Own Digital Platform

संविधानिक प्रतीनिधीत्वाला सरकारने मान्य करावे – एम. डी. चंदनशिवेम्हसवड : देशातील सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाला संविधानाच्या कलम १६(४) अन्वये प्रतीनिधित्व देण्यास कोणत्याही सरकारला कसलीच आडकाठी नाही.त्यामुळे सरकारने संविधानिक प्रतिनिधित्व मान्य करून वेळकाढूपणा करण्यापेक्षा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाला प्रतिनिधित्व बहाल केलेच पाहिजे असे बामसेफ या सामाजिक संघटनेचे स्पष्ट मत असल्याचे बामसेफचे जिल्हाध्यक्ष कैलास तोरणे व राज्य प्रशिक्षण सचिव एम.डी.चंदनशिवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

भारतात विषमतावादी समुहाने जातीव्यवस्था निर्माण केली असून क्रमिक असमानतेमुळे देशातील ऐक्य बाधित झालेले आहे. त्यामुळे सामाजीक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारे अश्या जातीसमुहांचे वर्गीकरण करून लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसे प्रतिनिधित्व देण्याची तरतूद डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या कलम १४,१५,१६ व ३४० मध्येच करून ठेवली आहे. 

मराठा व तत्सम समूह सामाजिक मागास आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणे ते आज घडीला खोलेबाई – यादव प्रकरणातून सिध्द झालेले आहे.जे सामजिक मागास मानले गेले आहेत ते सामाजिक, धार्मिक कायद्यांनी शैक्षिणिक मागास ठेवले गेले याचेही हजारो पुरावे आहेत.शिवाय अमेरिकेसह जगात ४० हून अधिक ठिकाणी सामाजिक, वांशिक मागासलेपणाआधारे प्रतिनिधित्वाची तरतूद केलेली आहे. 
 
अशावेळी संविधानाचा आधार घेवून सध्याच्या ओबीसी समूहाना लोकसंख्येच्या प्रमाणात ५२ टक्के व ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का न लावता मराठा व तत्सम सामाजिक मागास समूहांचा स्वतंत्र प्रवर्ग करून लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्वाची तरतूद करणे शक्य आहे. इंदिरा साहनी केसमधील ५० टक्के मर्यादा कलम १६(४) चा विचार करता काढून टाकणे शक्य असताना व नवव्या अनुसूचीचा घटनात्मक लाभ घेण्याची संधी असताना सत्ताधारी ती घेत नाहीत हाही चिंतेचा विषय आहे.

ही बाब तामिळनाडूमध्ये डीएमके करू शकते,नवव्या अनुसुचीचा लाभ उठवू शकते तर देशातील सर्व राज्यातील मराठा , जाट, गुज्जर आदी समूहांच्या जीवावर भूतकाळात व वर्तमानात सत्तेत असणारे पक्ष व सरकारे संविधानाची अंमलबजावणी का करत नाहीत हा महत्वाचा प्रश्न पत्रकात उपस्थित करण्यात आला आहे. तसेच मराठा, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती यांनी एकमेकाच्या संविधानिक हक्कांसाठी एकत्र येण्याचे आवाहन बामसेफ च्या वतीने करण्यात आले आहे.