Your Own Digital Platform

छ.संभाजी महाराज पतसंस्थेची रविवारी वार्षिक सभा


आदरकी : पिंपोडे बुद्रुक, ता.कोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पथसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी , दि २२ रोजी दुपारी १ वाजता पिंपोडे बुद्रूक (भावेनगर रोड) येथे छत्रपती संभाजी महाराज सांस्कृतिक भवनात होणार आहे.

ग्रामीण भागात स्थापन होऊन शहराकडे झेपावत सक्षम झालेल्या आयएसाओ मानांकित छत्रपती संभाजी महाराज सहकारी पथसंस्थेचा कारभार ७ विभागीय कार्यालये आणि पिंपोडे बुद्रूक,कोरेगाव,सातारा,कोल्हापूर,पुणे,मुंबई,नवी मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील ५२ शाखांमधून व्यवस्थित सुरु आहे.

 संस्थेच्या ५० टक्के शाखा स्वमालकीच्या जागेत असून ग्राहकांच्या सेवेसाठी व पारदर्शक कारभरासाठी स्वमालकीचे डाटा सेंटर व सीबीएस कार्यप्रणाली सुरु केली आहे. ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी नेट बँकिंग, व्हिडीओ ,मुख्यालयात एटीएम, सर्वांसाठी विमा योजना अशा सुविधा उपलब्ध आहेत. ऑडिट 'अ ' वर्ग असलेल्या या पतसंस्थेकडे ३१ मार्चअखेर ठेवी ३८३ कोटी २४ लाख रुपये, कर्जवाटप २७३ कोटी २५ लाख रुपये असून एकत्रित व्यवसाय ६५६ कोटी ४९ लाख रुपये आहे. संस्थेस 2 कोटी ६ लाख रुपये नफा झाला असून वसुली ९२ टक्के आहे. वार्षिक सभेस सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थापक रामभाऊ लेंभे, चेअरमन रावसाहेब लेंभे, व्हाईस चेअरमन जयवंत घोरपडे, प्रभारी कार्यकारी संचालक भावेश ढमाळ व संचालकांनी केले आहे.