सातारा बसस्थानकामध्ये महिला जागीच ठार


सातारा : सातारा बसस्थानकामध्ये रविवारी दुपारी 2 वाजता महिलेच्या डोक्यावरून एसटीचे चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शकुंतला जंगम असे मृत महिलेचे नाव समोर येत आहे. दरम्यान, महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, रविवारी सातारा स्टँडवर सुट्टीमुळे गर्दी होती. यावेळी सांगली फलाटाजवळ सातारा - सांगली (एम एच 14 बीटी 3270) ही एसटी लागत असताना अचानक अपघात झाला व त्यात महिला जागीच ठार झाली. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली. पोलीस चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. जमावाला हटवून रुग्णवाहिका बोलावण्यात आली.मृत महिलेची बॅग सापडली असून त्यानुसार शकुंतला जंगम असे नाव असल्याचे समोर आले आहे. अद्याप संपूर्ण ओळख पटलेली नसून पोलिस माहिती घेत आहेत

No comments

Powered by Blogger.