Your Own Digital Platform

म्हसवड वकील संघाच्या अध्यक्षपदी कांतीलाल शेटे, उपाध्यक्ष पदी अँड. कापसे बिनविरोध


म्हसवड : म्हसवड वकील संघाच्या अध्यक्षपदी अँड. कांतीलाल शेटे यांची तर उपाध्यक्षपदी अँड. व्ही व्ही कापसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन संघाच्या सचिवपदी अँड. सचिन माळवे तर सहसचिव पदी अँड. एस. आर. सावंत यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. 

वकिल संघाची निवडणुक जाहीर होताच वरील चौघांचा प्रत्येकी १ अर्ज वरील जागेसाठी आल्याने या चारही जणांची बिनविरोध निवड करण्यात आली, यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन अँड. दत्तात्रय हांगे यांनी काम पाहिले. नुतन पदाधिकार्यांचे अँड. एस. टी. नरळे, अँड. निसारअहमद काझी, अँड. यु. एस. डोंबे, अँड. एम. एस. डोंबे, अँड. एस. बी. कोळेकर, अँड. अभिजीत केसकर, अँड. बी. एम. गायकवाड, अँड. बी. डी. खांडेकर, अँड. स्मिता राऊत, अँड राजेंद्र भागवत आदींनी अभिनंदन केले