Your Own Digital Platform

उदयनराजेंच्या हस्ते अजिंक्यताऱ्यावर वृक्षारोपणसातारा : सातारा पालिकेच्यावतीने शहर व परिसरात वृक्षारोपण करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार खड्डे खोदून, वृक्षारोपणासाठी वृक्ष आणले होते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते अजिंक्यतारा किल्ले परिसरात 50 झाडांचे रोपण करण्यात आले. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सुचनेनुसार पालिका शहरातही ठिकठिकाणी वृक्षारोपण मोहिम हाती घेणार असून त्याचाच एक भाग म्हणून सदरबझार परिसरातील देशमुख कॉलनीत वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक वसंत लेवे यांनी दिली.

वृक्षारोपण मोहिमेवेळी नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, आरोग्य सभापती यशोधन नारकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, नगरसेवक विशाल जाधव, भाजपाचे माजी गटनेते धनंजय जांभळे, साविआचे ज्येष्ठ स्वीकृत नगरसेवक ऍड. दत्ता बनकर, नगरसेविका लता पवार, भाजपाच्या नगरसेविका आशा पंडित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. वृक्षारोपणावेळी खासदार उदयनराजेंनी नगरसेवकांना सुचना केल्या. त्यानुसार शुक्रवारी सदरबझार परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या वृक्षारोपणाबाबत बोलताना माजी आरोग्य सभापती अण्णा लेवे म्हणाले, शहराचे पर्यावरण राखण्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. शासनाने जो 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ठ दिले आहे. त्यानुसार सातारा पालिकेने वृक्षरोपण करण्याचे नेटके नियोजन केले आहे. ज्या कोणा नागरिकांना आपल्या परिसरात झाडे लावायची आहेत. त्यांनी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाशी संपर्क साधावा. शहरात जास्तीत जास्त झाडे लावण्यात येणार असून शहर हिरवेगार करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.