कोयना पर्यटन विकास आराखड्यास गती


सणबूर : कोयना पर्यटन विकास आराखड्यास वेग आला असून आ. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांच्या आढावा बैठका झाल्या. मागील अधिवेशनात पर्यटनमंत्री यांनी आश्‍वासित केल्याप्रमाणे पावसाळी अधिवेशनात या कामांना निधीची तरतूद होणार असल्याने याबाबतचा आराखडा सादर करण्याच्या सूचना आ. देसाई यांनी अधिकार्‍यांना बैठकीत दिल्या.

आ. देसाई यांच्या मागणीवरुन पर्यटनमंत्री रावल यांनी जिल्हाधिकारी, सातारा यांना दिलेल्या सूचनावरुन पाटण तालुक्यातील कोयना पर्यटन विकास आराखडयास लवकरात लवकर निधी उपलब्ध होणेकरीता हा आराखडा पावसाळी अधिवेशनातच पर्यटनमंत्री यांचेकडे सादर करण्यात येणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर आ.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण विश्रामगृह याठिकाणी महसूल, कोयना धरण व्यवस्थापन, सार्वजनिक व जि.प. बांधकाम विभागाचा तर कराड विश्रामगृह याठिकाणी या विभागातील वन्यजीव विभागांच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक घेण्यात आली.

आ. देसाई यांनी कोयना पर्यटन विकास आराखडयात केलेल्या मागण्यांमध्ये राज्य शासनाच्यावतीने हे आर्थिक वर्ष पर्यटन वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर प्राधान्याने कोयना धरण व येथील निसर्ग सौंदर्य लाभलेल्या कोयनानगर परिसराला प्रादेशिक पर्यटन स्थळांचा दर्जा द्यावा तसेच कोयना धरण व धरणाच्या परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटनांच्यादृष्टीने विकसीत करणेकरीता आवश्यक निधी देणे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हटले आहे.


येथील सर्व ठिकाणे विकसीत करणेकरीता आवश्यक निधीची अंदाजपत्रके तयार करण्याचे काम सुरु आहे.तशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक विनिता व्यास, उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, सहाय्यक वनसरंक्षक सुरेश साळुंखे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.