नामदेव परदेशी यांचे निधन


मायणी : मायणी ता. खटाव येथील यशवंतबाबा भजनी मंडळाचे माजी खजिनदार नामदेव परदेशी (आण्णा) यांचे आज अल्पशा आजाराने वयाच्या ८८ व्या वर्षी दु:खद निधन झाले . भजनी मंडळाचे स्थापनेपासूनअखेरपर्यंत मंडळाला त्यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले होते. त्यांनी स्वतःला झोकून देवून काम केले व कायम मंडळाचे हित बघितले . त्यांच्या निधनामुळे यशवंतबाबा भजनी मंडळात पोकळी निर्माण झाली. त्यांच्या पश्चात विवाहीत तीन मुले, दोन मुली, सूना व नातवंडे असा परिवार आहे.

No comments

Powered by Blogger.