मायणीच्या यशवंत बाबा महाराज पालखीचे दि. १५ रोजी पंढरपूरकडे प्रस्थान


मायणी : मायणी ता. खटाव येथील श्री संत सद्गुरु यशवंतबाबा महाराज यांच्या मायणी ते पंढरपूर पायी आषाढी पालखी दिंडी सोहळ्याचे रविवार दि. १५रोजी मायणीतून पंढरपूरकडे प्रस्थान.

रविवार दि.१५रोजी श्री यशवंतबाबा यांच्या समाधी मंदिरातून पालखी सोहळ्यास प्रारंभ होणार असून कानकात्रे, विखळे, तरसवाडी, विभूतवाडी, झरे, शेनवडी, दिघंची, चिकमहूद, महूद बु॥, डोणमळा, संतनगर मार्गे दि. २२ रोजी पंढरपूर येथे पोहचणार आहे. दि. २७ रोजी पंढरपूरहून धुळदेव, म्हसवड, कुकुडवाड मार्गे दि. २९ रोजी मायणीस परतणार आहे.

No comments

Powered by Blogger.