Your Own Digital Platform

पंचायत समितीत सौ. जयश्री आगवणे आक्रमकस्थैर्य, फलटण: येथील काल बुधवार (दि. 18) रोजी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री आगवणे आक्रमक झाल्या. अधिकारी उपस्थित आहेत का ? हे पहा तरच कामकाज सुरु ठेवा, असे मत आगवणे यांनी मांडले. त्याचबरोबर फलटण-बारामती रस्त्याचे निकृष्ठ काम झाले आहे. त्यावर लक्ष द्या, असेही सौ. आगवणे यांनी स्पष्ट केले.

पंचायत समितीच्या सदस्यांनी ‘‘थांबा, अगोदर सर्व अधिकारी उपस्थित आहेत का? हे पहा तर कामकाज सुरू ठेवा.’’ प्रत्येक मिटींगला अधिकारी अनुपस्थित राहतात. मग, आमच्या भागातील कामासंबंधी प्रश्‍नांचे निरसन कोण करणार सभा घेण्याला काही अर्थच नसल्याचे सांगत खेद सौ. आगवणे यांनी व्यक्त केला. कार्यकम पत्रिकेतील एस .टी. महामंडळाचा विषय सभागृहातील पटलावर वाचण्यात आला असता या विषयाची माहिती देणारा अधिकारीच उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, सौ. आगवणे यांनी मिटींग स्थगित ठेवण्यात यावी अशी मागणी करून आता आपण सर्वच एसटीच्या अधिकार्‍यांकडे जाऊ असा आग्रह धरला. यावर सभापती सौ. भोसले यांनी कामकाज पुढे चालू द्या. सभेनंतर आपण प्रत्यक्ष बसस्थानक कार्यालयातच जावु असे सांगितले असता आमच्या भागातील एसटी संबधी अनेक प्रश्‍न आहेत, आता ते कुणाला विचारायचे? असे म्हणत सौ. आगवणे यांनी सभागृहात अनेक प्रश्‍न उपस्थित केले. दरम्यान, उपसभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी मध्यस्थी करत अनेक खात्याचे लोक पालखीसंबधीच्या कामात असल्याने ते आज ते आले नसतील पुढील कामकाज चालु ठेवण्यात यावे अशी विनंती केली आहे.