विंचुरणी रोडवरील खड्ड्यांमध्येच वृक्षारोपण


फलटण मांडवखडक विंचुरणी मार्गे रोड वरील खड्यामध्ये 1 जुलै रोजी वृक्षा रोपण करताना विंचुरणी गावातील तरुण युवक गेली 4 वर्षा पासून फलटण विंचुरणी रोडची अतिशय वाईट अवस्था झाली आहे वारंवार तक्रार करून सुध्दा प्रशासन आणि ग्रामपंचायत याकडे लक्ष देत नाहीत.

वृक्षरोपण करीत असतानाच तेथे मिरेवाडी फलटण एस टी आली त्यावेळी चालक आणि वाहक यांनी खाली उतरून युवकांचे आभार मानले ते म्हणाले आम्ही सर्व जिल्ह्यातील गावात जात असतो परुंतु सर्व जिल्ह्यात फलटण मंडवखडक विचुरणी मार्गे रोड हा सर्वात खराब आहे एस टी चालवत असताना खूप त्रास होतो परंतु कामापुढे आम्हाला काही करता येत नाही तुम्ही जे रोडच्या खड्यात झाडे लावून प्रशासनलाजागे करीत आहात ते काम खरच चांगले आहे.

No comments

Powered by Blogger.