Your Own Digital Platform

म्हसवडकरांना आठवड्यातून एकदा पाणी
म्हसवड : म्हसवड शहरासाठी मुबलब साठा असतानाही पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे आठवड्यातून एकदा पाणी येत आहे. यामुळे नागरिकाचे हाल सुरू आहेत तर दुसरीकडे पदाधिकारी बेकायदा वाळूचे ठराव करून स्वत:चे उखळ पांढरे करण्यात मश्‍गूल आहेत. या मनमानी कारभारामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

म्हसवड शहरात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट झाली आहे. उन्हाळ्यात नागरिकांनी टंचाई सहन केल्यानंतर आता पावसाळ्यातही त्यांचा त्रास सुरूच आहे. पालिकेतर्फे सोडण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे कसलेच वेळापत्रक नाही. नागरिकांना या पिण्याच्या पाण्याचे हाल सोसावे लागत आहे.

नागरिकांच्या मुलभुत सुविधांबाबत आठवड्यातून विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेवून योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे असताना सत्ताधारी नगरसेवकासह नगराध्यक्ष यांनाही गांभीर्य नसल्याचे नाही तर विरोधी नगरसेवकही याबाबत आवाज उठवत नसल्याचे दिसत आहे. स्वता:च्या अर्थिक फायद्यासाठी पदाधिकाऱ्यांनी माणगंगा नदीचे वाटेळे करण्याचा विडा उचलल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. म्हसवड शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे