पंचायत समिती फलटण कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बियाणे वाटप


राजुरी : फलटण पंचायत समिती च्या कृषी विभागाच्या वतीने व संकल्प फाऊंडेशन राजुरी यांच्या माध्यमातून राजुरी येथे मका व बाजरी बियाण्यांचे अनुदानावर वाटप करण्यात आले. 

संकल्प फाऊंडेशन च्या वतीने पंचायत समिती कृषी विभागास विनंती करून राजुरी व परिसरातील शेतकऱ्यांना फलटण येण्याचा त्रास होऊ नये म्हणून ही मका व बाजरी बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
पंचायत समितीच्या कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन कृषी सहायक महागडे यांनी सांगितले. 

यावेळी पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी सौ. लावंड, कृषी सहायक महागडे, कृषी सहायक बोडरे , संकल्प फाऊंडेशन चे अध्यक्ष अनिल चव्हाण, उपाध्यक्ष सोमनाथ रणदिवे, खजिनदार संतोष काशिद, कार्याध्यक्ष गणेश बागाव, सचिव प्रेम शिंगाडे, राजुरी वन समितीचे अध्यक्ष विजय साळुंखे, मा. ग्रा.प. सदस्य विजय रणदिवे, युवा नेते सुखदेव रणदिवे, भारिप चे फलटण तालुका उपाध्यक्ष प्रकाश रणदिवे, पोलीस पाटील लक्ष्मण बागाव, पै. बिपीन बागाव, तेजस माळवे, रत्न सम्राट युवा मंच चे अध्यक्ष अविनाश रणदिवे, दादा मदने, ज्ञानेश्वर जाधव, मनोहर रणदिवे, सिध्दार्थ रणदिवे, भिमराव रणदिवे, नारायण रणदिवे, मोहन गावडे, अमोल लोंढे, सोमनाथ माळवे, दत्तात्रय रणदिवे, शामराव बागाव, सचिन रणदिवे, किरण रणदिवे , कोंडिबा रणदिवे, यांच्यासह अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

संकल्प फाऊंडेशन ने पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी बियाणे उपलब्ध करून दिल्या बद्दल राजुरी व परिसरातील शेतकऱ्यांनी संकल्प फाऊंडेशन ला धन्यवाद दिले आहेत. प्रास्ताविक व आभार सुखदेव रणदिवे यांनी मानले.

No comments

Powered by Blogger.