तडीपार गुंडाला अटक


सातारा : शाहूपुरी पोलिस ठाणे हद्दीतील तडीपार आरोपी नथू गायकवाड (वय 21, रा. ऐक्य प्रेस झोपडपट्टी) याला जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. नथू गायकवाड हा उरमोडी धरण परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

त्यानुसार शनिवारी दुपारी पोलिसांच्या एका पथकाने या परिसरात सापळा रचला. परंतु, त्याला पोलिसांची चाहूल लागल्याने त्याने झुडपांचा आधार घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. तडीपारीचे उल्‍लंघन केल्याप्रकरणी नथू गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments

Powered by Blogger.