Your Own Digital Platform

धोम बलकवडीचे पाणी कॅनाल ला सोडावे शेतकऱ्यांची मागणी


राजुरी : धोम बलकवडी चे धरण 90 टक्के च्या आसपास भरले आहे. या लाभ क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांनी मका, बाजरी, जनावरांसाठी लागणारा चारा आदी पिके घेतली आहेत. या पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागल्यामुळे या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नाने धोम बलकवडी चे पाणी फलटण तालुक्यातील आदर्की ते आंदरूड या पट्ट्यात जवळपास आले आहे. या पाण्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी शेतात विविध पिके घेण्यास सुरुवात केली आहे. या पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे धोम बलकवडी च्या कॅनाल ला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. 

या कॅनाल च्या माध्यमातून या लाभ क्षेत्रात येणारे तलाव भरल्यावर या भागातील शेतकऱ्यांसाठी ते फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी वर्गाने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर पाणी सोडावे अशी मागणी शेतकर्‍यांच्या कडून केली जात आहे.