Your Own Digital Platform

कुशल कारागिरांच्या शोधात …… मुर्तीकारांची धावाधाव


सातारा : कुशल मदतनीसाची कमतरता, समस्येत वाढ, गणेशमंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग कोट्यावधी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेला गणेशोत्सवाचा सण जसजसा जवळ येत आहे. तसतसा मुर्तीकारांच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. लाखो रुपयांची देवाणघेवाण होत असलेल्या सातारा शहरात गणेश मुर्तींना मोठी मागणी आहे. मात्र मुर्तीकारांपुढे घेतलेली ऑर्डर वेळेत पुर्ण करणे हे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मदतनिसाच्या अभावापुढे मुर्तीकारांवर अधिक ताण पडत असल्याचे दिसून येत आहे. मागणीनुसार कुशल मनुष्य बळाचा पुरवठा होत नसल्याने मुर्तीकार हतबल झाल्याचे जाणवते. अधिक रककम देऊन ही कारागीर मिळेनात. यामुळे मुर्तीकारांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.

सुबक व आर्कषक मुर्ती घडविणासाठी मुर्तीकारांना कलात्मक कारागिराची मोठी गरज असते गणेश मुर्ती वेळेत पूर्ण करण्यासाठी या मनुष्य बळाचा उपयोग होत असल्याने या काळात त्यांना मोठी मागणी असते. कौशल्य व कलात्मक मनुष्यबळ या काळात प्रत्येक मुर्तीकारांना हवा असतो परंतु कुंभारवाडयातील सध्यस्थिती पाहता मुख्य मुर्तीकाराना मदतनीस व कारागिराचा तुटवडा जाणवतो.

गणेशोत्सवाची चाहूल लागल्याने विविध मंडळांच्या कार्यकर्तोची कुंभारवाड्यात फेऱ्या वाढल्या आहेत मंडळीची मुर्ती सुंदर व आर्कषक व मोठी असावी याकरीता मुर्तीकाराना आवडीचे छायाचित्रे दाखवून त्या प्रमाणे मंडळाचे कार्यकर्ते मुर्ती बनवण्याचा आग्रह धरत आहेत. साताऱ्यातील गणेश मंडळांची वाढती संख्या पाहता त्यामानाने मुर्तीकार व मदतनीसाचे प्रमाण अल्प आहे. मुर्तीची संख्या अधिक असल्याने मुर्तीकारांपुढे वेळेत मुर्ती पुर्ण करून देण्याचे मोठे आव्हान उभे आहे. साताऱ्यात गणेशमुर्ती बनविण्याचे ठिकाण असलेले गडकर आळी, बुधवार पेठ, रविवार पेठ त्याच प्रमाणे परळी येथील कुंभारवाडयामध्ये गणेशमुर्ती अनेक गणेश मंडळानी ठरवलेल्या आहेत. कारागिराच्या तुटवडा ही मोठी समस्या मुर्तीकारांपुढे पडली आहे. काळाच्या ओघात कलात्मक क्षेत्राची ओढ कमी झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.

कुशल मुर्तीकाराना मुर्ती घडविण्यापूर्वी प्राथमिक स्वरुपाच्या कामकाजासाठी मदतनीसाची नितांत गरज असते. साच्या तयार करणे शाडू मळणे मुर्तीला आकार देणे यासाठी आवषयक मदतनीस प्राप्त झाल्यास मुर्तीकाराचे काम सुलभ होते मदतनीस व कारागिराच्या तुटवड्यामुळे अनेक वेळ मुर्ती तयार करण्यास विलंब होतो परिणामी मंडळयाच्या कार्यकर्त्यांच्या रोशाला सामोरे जावे लागते.
-श्रीरंग काटेकर, सातारा