कापडगांव ग्रामपंचायतीच्या वतीने तीस एकर जमीनीची स्वच्छता - भाविक भक्तांच्या राहणेसाठी अडचण ओळखून व्यवस्था


आरडगांव :  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शुक्रवारी दि.१३ रोजी लोणंद ता. खंडाळा येथे मुक्कामी येत असून वारकरी व भाविक भक्तांच्या सेवेसाठी कापडगाव ग्रामपंचायतीच्यावतीने जय्यत तयारी सुरू आहे .कापडगांव ता. फलटण येथील सरदेच्या ओढ्या शेजारील असणाऱया मोकळ्या पटांगणावर असणारी छोटी मोठी काटेरी झाडी झुडपे, तरवड, गवत काढण्यात आली असून ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने पटांगणाची लेवलींग करणेत आली आहे. जवळपास तीस एकर मोकळ्या पटांगणाची साफसफाई करणेत आलेली आहे.

 महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा. रामराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष मा. संजिवराजे नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने प्रथमचं या वर्षी एवढया मोठया पटांगणाची भाविक भक्तांना राहण्यासाठी सोय केलेली आहे. भाविक भक्तांना लोणंद मुक्कामी पालखी आले नंतर राहण्याची अडचण येता कामा नये यासाठी ही व्यवस्था करणेत आली आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंदवरुन तरडगांवला मार्गस्थ होते त्यावेळी सर्व वाहने सईबाई होसींग सोसायटी मार्गे कापडगांव, चव्हाणवाडी ,आरडगांव मार्गे फलटणला जातात, कापडगांवच्या शेजारी असणाऱ्या सरदेच्या ओढयावर पडलेले छोटेमोठे खड्डे मुजवून खराब रोडवर मुरुम टाकुन रोडच्या साईडच्या मुरमाने भरल्या गेल्या आहेत.

खराब झालेल्या रोडवर मुरुम टाकला आहे, पटांगणाची स्वच्छता करतेवेळी कापडगांवचे सरपंच हेमंत भाऊ कचरे, माजी सरपंच वैभव खताळ, सुनिल करे ग्रामपंचायत सदस्य प्रविण खताळ, दादा करे, संजय करे, सोसायटीचे माजी चेअरमन दशरथ बापू खताळ, सुनिल जाधव, प्रा. भिमराव काकडे, वालचंद करे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप महाराज खताळ व कापडगांव मधील असंख्य ग्रामस्थ ऊपस्थित होते. ( छाया- सुरेश भोईटे, ( ट्रॅक्टरच्या सहाय्याने पटांगणाची स्वच्छता करतेवेळी कापडगांवचे सरपंच हेमंत भाऊ कचरे, प्रविण खताळ, वैभव खताळ, दशरथ खताळ, संजय करे आदी मान्यवर ) (सरदेच्या ओढयावरील रोडवर ट्रेक्टरने मुरुम टाकतेवेळी, सरपंच हेमंत कचरे, वैभव खताळ, संजय करे व ग्रामस्थ )

No comments

Powered by Blogger.