Your Own Digital Platform

आर्मी भरतीत लक्ष्य ऍकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे यश


ललगुण : ललगुण, ता. खटाव येथील लक्ष्य-करिअर ऍकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीत घवघवीत यश मिळवत शंभर टक्के निकालाची परंपरा राखली.

यावर्षी भरतीत 27 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यश मिळवले. यशस्वीतांमध्ये काजल शेळके, स्नितल दुपडे, चैताली जाधव, पोर्णिमा पवार, निलम जाधव, मेघा ननावरे, सुमन जगताप, अंजली सगर, भाग्यश्री कुऱ्हाडे, ज्योती काकडे, माया यादव, लता जाधव, शामल घाडगे, रेखा राठोड, राजश्री गोरे, वर्षा बाबर, मंजुषा बादुले, काजल मोहिते, सुशांत खलाटे, दादासो नाइकवरे, रोहन शिंदे, आदित्य डोईफोडे, रोहन शिंगाडे, ऋषिकेश नलवडे, शरद कोळी आदींचा समावेश आहे. 

गेल्या वर्षी पोलीस, आर्मी, स्टाफ भरतीत 72 मुलांची निवड झाल्याची माहिती प्रा. शंकरराव खापे यांनी दिली. ऍकॅडमीमध्ये गुणवतापूर्व प्रशिक्षण दिले जात असून पोलीस, आर्मी, स्टाफ सिलेक्‍शन, एयर फोर्स, नेव्हीचे नियोजनबध्द शिक्षण दिले जाते, सकाळी 5पासून रात्री 11 वाजेपर्यंत मुलांची मैदानी तसेच लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी केली जात असल्याची माहिती खापे यांनी दिली. ऍकॅडमीचे सुसज्ज ग्राऊंड, जीम, नेमबाजी, तज्ज्ञ शिक्षकांद्वारे, प्रशिक्षण, ऍकॅडमीमार्फत राहण्याची, जेवणाची उत्तम सोय असून आगामी भरतीसाठी प्रवेश सुरू असल्याची माहिती प्रा. शंकरराव खापे यांनी सांगितले.