राजुरी येथे क्रिकेटच्या विजेत्या संघाला बक्षिस वितरण संपन्न


राजुरी : राजुरी ता. फलटण येथील श्रीराम क्रिकेट क्लब राजुरी यांचे विद्यमाने भरवण्यात आलेल्या विजेत्या संघाला बक्षिस देवून सन्मानित करण्यात आले. 

या क्रिकेट सामन्याचे बक्षिस वितरण फलटण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे, युवा नेते मफतलाल पवार, ग्रामपंचायत सदस्य भाऊसो जाधव, युवा नेते विनोद घोलप, प्रतिष्ठीत बागायतदार मधुकर गावडे, सतीश नलवडे, दादा खांडे, कुरवली बु चे पोलीस पाटील नवनाथ शेंडे, आरूण घोलप, भैय्या पवार यांच्या सह मान्यवर मंडळी उपस्थित होती. 

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 7 हजार रुपये घातक क्रिकेट क्लब गिरवी ता. माळशिरस या संघाने पटकाविले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 5 हजार रुपये श्रीराम क्रिकेट क्लब राजुरी यांनी पटकाविले. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक 3 हजार रुपये शिवशक्ती क्रिकेट क्लब वाजेगाव या संघाने पटकाविले. तर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक 2 हजार रुपये मांडवे क्रिकेट क्लब मांडवे ता. माळशिरस या संघाने पटकाविले. या स्पर्धेत सुमारे 30 संघानी सहभाग घेतला होता. 

बक्षिस वितरण समारंभाच्या वेळी खेळाडू व क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.