Your Own Digital Platform

तांबवे शाळेत इंग्रजी शिका मजेतुन दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न


आरडगांव : तांबवे तालुका फलटण येथे कायापालट फोरम व रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमानशेठ गणपतराव सूर्यवंशी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी शिका मजेतुन दोन दिवसीय कार्यशाळा इयत्ता नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली . देश व विदेशात मार्गदर्शन करणाऱ्या डॉ.मनिषा पाटील इंग्रजी विभागप्रमुख यशवंतराव चव्हाण इंस्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा यांना विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणेसाठी पाचारण करणेत आले होते.

 इंग्रजी विषयाचे भय विद्यार्थ्यांच्या मनातुन त्यांनी काही ऊदाहरणे देऊन घालवले, मुलांना त्यांनी पुढे काय बनु इच्छीता हे विचारले, मुलांनी डॉक्टर इंजिनियर, पोलिस, शास्त्रज्ञ, वकील, न्यायाथिश, शिक्षक, आयएएस, बनायचयं अस सांगीतले, स्वताला हातपाय नसणारया व्यक्ती सुद्धा सर्व क्षेत्रात अग्रेसर राहतात ते कुठेही कमी पडत नाहीत हे विद्यार्थ्यांच्या पुढे चलचित्राच्या द्वारे सादरीकरण करुन दाखवले, हा चलचित्र बघितल्यानंतर प्रयत्न केल्यास अशक्य गोष्ट शक्य करता येते, प्रयत्न केल्यास कोणतीही गोस्ट अवघड नाही,भाषा शिकताना चुका होणारच अशा चुकांमुळे इंग्रजी बोलण्याचे सोडून मात्र देऊ नका. 

इंग्लिश विंग्लिश मधील अमिताभच्या पात्राने दिलेला कानमंत्र लक्षात ठेवा - बेशक बेफिकीर इंग्रजी बिनधास्त बोला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंग्रजी एन्जॉय करा ,नवीन भाषा शिकताना आपल्याला मिळतात नवीन अनुभव, नवे विचार, नवी संस्कृती या नवीन दृष्टिकोनाचा आनंद घ्या मग भाषा आत्मसात करणे एक कंटाळवाणा अभ्यास न राहता एक रसरशीत जिवंत अनुभव येईल. कोणत्याही हाती घेतलेल्या कामाची भिती न बाळगता त्याचा पाठलाग करुन त्यामध्ये यश संपादन केले पाहीजे हे विद्यार्थ्यांना ऊमगले, त्यामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये असणारी इंग्रजी विषयाची भिती दुर करणेचा प्रयत्न केला, इंग्रजी बोलणे काहीहीअवघड नाही, मराठीप्रमाणे सहज आपण इंग्रजी बोलु शकतो त्यासाठी काय करावे लागते, हे काही ऊदाहरणे देऊन पटवून दिले, इंग्रजी विषयाबद्दलची असणारी भिती कायमची दुर करणेसाठी पाटील मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले, मुलांना कोणत्या विषयाची व कशाची भिती आहे हे चिठ्ठीवर लिहणेस सांगीतले, व प्रत्येकाजवळ फुगा देऊन ती चिठ्ठी त्यामध्ये टाकावयास सांगीतली, सर्व फुगे फुगवण्यास सांगुन पुन्हा ते फोडण्यास सांगीतले, सर्व फुग्यातील चिठ्ठया विखुरल्या गेल्या, पुन्हा त्या सर्वांना गोळा करणेस सांगीतल्या, काहींना गणिताची, इंग्रजीची भूमितीची भिती तर काहींना चक्क आई,वडीलांची भीती वाटत असल्याचे चिठ्ठीद्वारे समजले. 

फुग्यांचा खेळ विद्यार्थ्यांना भरपूर आवडला. सर्व विद्यार्थ्याच्या मनातील इंग्रजी विषयाची भिती डॉ.मनिषा पाटील यांनी घालवून ऊकृष्ठ मार्गदर्शन केले बद्दल स्कूल शाळेचे मुख्याध्यापक मा.सुरेश रीटे, स्कूल कमिटीचे संचालक मा.रमेश ( अण्णा ) शिंदे, मा. रविंद्र ( बापू ) शिदे, प्रा. शशिकांत शिंदे ऊपशिक्षक मा.राखुंडे सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोजीत सत्कार करणेत आला.