उपोषणकर्ते अजित मोहिते यांची प्रकृती खालावली


सातारा : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी( मंद्रुळकोळे) येथील सामाजिक कार्यकर्ते अजित मोहिते यांची प्रकृती खालावली असून त्यांना सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 ढेबेवाडी विभागात जलयुक्त शिवार योजनेत कृषी अधिकारी कार्यालयाने चुकीच्या पद्धतीने आराखडा केला असून सबंधित गावांत निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाच्या निधी लाटला आहे त्या कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीबाबत जिल्हाधिकारी सातारा यांचे कडून कार्यवाही झाली नसल्याच्या निषेधार्ह नाईलाजाने कृषी दिनी 1 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न पाण्याविना बेमुदत उपोषण सुरू केले आहे. चार दिवस होऊनही जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही.

दरम्यान बुधवारी रात्री त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शहर पोलिसांनी जबरदस्तीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्या ठिकाणी त्यांचेवर उपचार सुरू आहेत.

No comments

Powered by Blogger.