Your Own Digital Platform

खटाव तालुक्‍यात दूध बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद


वडूज : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये अनुदान देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला खटाव तालुक्‍यात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. तिसऱ्या दिवशीही तालुक्‍यातील दूध उत्पादकानी स्वयंस्फूर्तीने भाग घेत हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला.

तालुक्‍यतील विविध खासगी दूध संघ आणि चिलिंग प्लांटकडून जवळपास दिवसाला 1लाख 35 हजार लिटर दूध संकलन होते. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून अपवाद वगळता सर्व संघांनी यामध्ये सहभाग घेतला. चोराडे मधील दुधसंघ दूध खरेदी करत असल्याची तक्रार आल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना इशारा दिल्यानंतर त्यानीही नमते घेत दूध खरेदी टाळली. कातरखटावमध्ये दूध आंदोलनात शेतकरी बांधव आणि युवक कार्यकर्ते सहभागी झाले. वैभव पाटील, राजेंश नलवडे, दीपक पद्ममण, विजय सानप, दिलीप पाटोळे, अजय पाटील,अदित्य बागल यांनी मसाले दूध बनविण्यासाठी 500 लीटर दूध मोफत दिले.

 40 दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला. मोराळे गावातील कार्यकर्त्यांनीही ग्रामदैवताला दुधाचा अभिषेक घातला. दुसरीकडे स्वाभिमनीचे कार्यकर्ते आणि आंदोलन करणाऱ्या लोकांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. तर शेतकऱ्यांसह दूध खरेदी केंद्र, संघांनीही संकलन न केल्याने आंदोलनाची धार अधिकच वाढली. तर आज होणाऱ्या चक्का जाममध्ये सरकारचा निषेध नोंदवण्याची संधी मिळणार आहे.

तालुक्‍यातील दूध उत्पादकांनी सलग दोन दिवस दूध घालणे बंद ठेऊन एकीचे दर्शन घडवले आहे. त्यामुळे 100 टक्के दूध संकलन बंद राहिले आज होणाऱ्या चक्का जाम आंदोलनाच्या घोषणेमुळे सरकार नमते घेत असल्याचे चित्र आहे. दूध दरवाढ घेऊनच या आंदोलन यशस्वी होणार आहेत.
– अनिल पवार
राज्य प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना