Your Own Digital Platform

उपोषणकर्ते अजिनाथ केवटे यांची ६ व्या दिवशी प्रकृती बिघडली, सिव्हील रुग्णालयात उपोषण सुरुच


म्हसवड : म्हसवड पालिकेचे नगराध्यक्ष ,नगरसेवक व मुख्याधिकारी यांनी सभागृहातील जनरल कौन्सीलच्या मिटींग मध्ये आरक्षित वाळू गटाचा नामंजूर केलेला ठराव परस्पर बेकायदेशीररीत्या मंजुर केल्यामुळे संबधित पदाधिकारी व मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा व त्यांना बडतर्फ करावे या मागणी साठी सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांचे म्हसवड पालिकेसमोर गत ६ दिवसांपासुन बेमुदत आमरण उपोषण सुरू ६ व्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र येथेही आपले उपोषण सूरु ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हसवड पालिकेच्या दि १६ एप्रिल २०१८ च्या मिटींग मधिल आरक्षित वाळू गटाचा ठराव नामंजूर करण्यात आला होता सदर नामंजूर झालेला ठराव पालिकेचे नगराध्यक्ष , सत्ताधारी गटतील नगरसेवक व विरोधी गटाचे नगरसेवक , व मुख्याधिकारी यांनी परस्पर तडजोडी करून बेकायदेशीर रित्या पालिकेच्या बाहेर मंजुर बोगस कागदपत्रे बनवून जिल्हाधिकारी यांना सादर केेल्याचा आरोप केवटे यांनी केला असुन त्यांनी या बेकायदेशीर ठरावाच्या विरोधासाठीपालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे.