सामाजिक कार्यकर्ते अजित मोहिते यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण


ढेबेवाडी : ढेबेवाडी ता.पाटण विभागातील कृषी विभागाच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून, सबंधित अधिकाऱ्यांच्या वर कारवाईस करणेच्या मागणी बाबतीत सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी टाळाटाळ केलेच्या निषेधार्थ ढेबेवाडी विभागातील सामाजिक कार्यकर्ते अजित मोहिते यांनी कृषी दिनापासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

ढेबेवाडी विभागातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सन 2017-2018चा जलयुक्त शिवार योजनेचा आराखडा 2 आक्टोंबर रोजीच्या ग्रामसभेत सबंधित गावांचा ठराव न घेता कृषी अधिकाऱ्यांनी घरी बसुनच तयार केला आहे. कृषी खात्याने आजपर्यंत केलेल्या कामांपैकी एकही काम लोकहिताचे नाही. विभागातील मोडकवाडी(जिंती), कोळेकरवाडी, आंब्रुळकरवाडी, (भोसगाव),कारळे,रूवले,उधवणे,पाळशी, सळवे,सुतारवाडी, (मालदण)भिलारवाडी, डाकेवाडी, (काळगाव), शिद्रुकवाडी,काढणे, या गावांची माहिती माहितीच्या अधिकाराखाली मोहिते यांनी मागितली असता चुकीची माहिती देण्यात आली.

या संदर्भात मा.जिल्हाधिकारी सातारा यांना दि.14/3/18 रोजी चौकशी करून सबंधित कृषी खात्यावर कारवाई करणे बाबतच्या मागणीबाबत अर्ज देण्यात आला. त्यावेळी मा. जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काहीच कारवाई झाली नाही. तसेच लोकशाही दिनामध्ये सुद्धा सबंधित कृषी खात्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन दिले होते. मात्र काहीच दखल घेतली नसल्याने दि. 21/6/18 रोजी मा . जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांना अर्ज द्वारे कळविले होते. मात्र कोणतीच कारवाई झाली नाही. आज अखेर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने कोणत्याही प्रकारची चौकशी केली नसल्याने सामाजिक कार्यकर्ते अजित मोहिते यांनी नाईलाजाने 1जुलै रोजी कृषी दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

तसेच मा. जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्या उपोषणाची गांभीर्याने दखल घेऊन सबंधित कृषी विभागाच्या कामांची तातडीने चौकशी करून दोषीं अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी अजित मोहिते यांनी केली आहे.

No comments

Powered by Blogger.