फलटणला वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची भरपाई द्या: आमदार दीपक चव्हाण यांची अधिवेशनात मागणी


नागपूर (थेट पावसाळी अधिवेशनातून) : फलटण तालुक्यात गत महिन्यात पावसाने धुमाकूळ घातल्याने १ कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा तयार आहे. फलटण तालुक्यात वादळी वाऱ्याने झालेल्या आपतग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार दीपक चव्हाण यांनी आज मंगळवार (दि. १०) रोजी केली.

फलटण तालुक्यात रविवारी (दि. २७ मे) रोजी रात्री 9:30 च्या सुमारास  विजांच्या कडकडाटासह सुटलेल्या वादळी वाऱ्याने शहरासह ग्रामीण भागातील घराची पडझड होऊन 216 पेक्षा अधिक घराचे नुकसान झाले असून महसूल विभागाने केलेल्या प्राथमिक पहाणीत सरासरी 76 लाख 47 हजार 216 रुपयांचे  नुकसान झाले असून नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच या वादळात झिरपवाडी येथे नवीन घराची भिंत कोसळून एक महिला ठार झाली असून सोनवडी बुद्रुक येथे दोन जण गंभीर जखमी झाले असून आसू ता. फलटण येथे एक म्हेस ठार झाली होती. फलटण शहरासह फलटण तालुक्यातील अनेक घराचे पत्रे उडून संसारूपयोगी साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये डाळिंब, केळी, आंबा, बोर, अशा पिंकाचे 16 शेतकऱ्यांचे मिळून 14 लाख रुपयांचे नुकसान झाले होते.

झिरपवाडी ता. फलटण येथे छाया साहेबराव जाधव (वय 52) यांच्या नविन  घराचे बांधकाम सुरू होते अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात व पावसात त्या सिमेंट व ईतर साहित्य झाकण्यास गेल्या असता सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नवीन बांधकामाची भिंत पडून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.

तसेच सोनवडी बुद्र्क ता. फलटण येथील सदाशिव तात्याबा खिलारे व त्यांचे बंधू यशवंत तात्याबा खिलारे या दोघांच्या अंगावर भिंत कोसळून दोघे गंभीर जखमी झाले. दोघाना अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती ठिक असल्याचे  महसूल विभागाने  सांगितले आहे. तसेच आसू ता. फलटण येथे अनिल दत्तात्रय पवार यांची 55 हजार रुपये किंमतीची म्हैस यात ठार झाली होती.

फलटण शहरातील शंकर मार्केट परिसरात  डॉ.जगताप यांच्या नवीन असणाऱ्या कारवर झाड  एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोसळलेले की दोन्ही टायर फुटून कारचा चक्काचूर झाला तसेच फरांदवाडी ता. फलटण येथे दोन मोटर सायकलवरती झाड कोसळून गाड्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

वादळी वाऱ्याचे प्रचंड प्रमाण असल्याने अनेक घराची अनेक गावांत पडझड झाली (गावे- पडलेल्या घरांची  संख्या)खडकी-(2) मलवडी -(6) मिरगाव -(3), फलटण शहर- (32) धुळदेव - (13) अलगुडेवाडी -(10) जाधववाडी -(1) फरांदवादी- (3). ठाकुरकी (21) , झिरपवाडी -(5) , कोळकी -(11) सस्तेवाडी- (10) ,चौधरवाडी -(2 ),.. काशीदवाडी (2 ), वडजल-(2) , वाठार निंबाळकर -(3) , वाखरी-(1)  बिबी-(7 ) निरंगूडी-(17)  गिरवी-(3 )साठे-(1) सरडे-(21) गोखळी-(2 )खटकेवस्ती-(4) हनुमंतवाडी-(1) वडले-(5) सोनवडी बुद्रुक-(6)गुणवरे-(2) ढवळेवाडी-(2) अशा एकूण 216 घराचे  महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार घरांची पडझड झाली होती.

या सर्व आपतग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार दीपक चव्हाण यांनी केली.

No comments

Powered by Blogger.