सातारा- जावलीतील चार रस्त्यांसाठी 11 कोटींचा निधी


सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जावली मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि वाडीवस्ती डांबरी रस्त्याने जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. सातारा तालुक्‍यातील तीन आणि जावली तालुक्‍यातील एक अशा चार रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल 11 कोटी लाख 12 हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे एकूण चार रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत. सातारा तालुक्‍यातील ग्रामीण मार्ग अंबवडे बु. ते लावंघर रस्ता , रायघर रस्ता , जकातवाडी ते करंडी रस्ताय रस्त्यांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

जावली तालुक्‍यातील भिलार ते आखेगणी या जावली तालुक्‍यातील रस्त्याच्या कामासाठी 3 कोटी 50 लाख 19 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. या कामाचे तातडीने शासकीय सोपस्कार पूर्ण करुन रस्त्याची कामे दर्जेदार करा, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

No comments

Powered by Blogger.