13 मोबाईल चोरट्यास अटक


नागठाणे : 13 मोबाईल चोरीसह दोन घरफोड्या करणाऱ्या चोरट्यास बोरगाव पोलिसांनी आज अटक केली. देवानंद प्रल्हाद सकट (वय 38, रा. नेवरी) असे चोरट्याचे नाव आहे. त्याने विविध ठिकाणांहून 13 मोबाईल चोरले होते. नागठाणे, काशीळ, तारगाव, इंदोली, पाली आदी ठिकाणी ते विकले होते. पोलिसांनी ते हस्तगत केले. बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याने दोन घरफोड्याही केल्या आहेत.

बोरगाव पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, सराईत घरफोड्या करणारा चोर देवानंद प्रल्हाद सकट वय 38 रा.नेवरी(ता.कडेगाव जि.सांगली) यास 28 फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्याच्या तापासकामी ताब्यात घेतले असता संशयिताने चोरी केलेले वेगवेगळे कंपनीचे मोबाइल हॅंडसेट नागठाणे, तारगाव, इंदोली फाटा, पाली, काशीळ इत्यादी परिसरात विकले असल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे 13 मोबाईल बोरगाव पोलिसांनी हस्तगत केले. आरोपीची चौकशी करताना संशयीताने बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

बोरगावाचे स.पो.नि.संतोष चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघडकीस आणला. ज्या परिसरातील लोकांचे मोबाईल चोरीस गेले आहेत त्यांनी आयएमईआय नंबरची खात्री करून घेऊन जावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे. देवानांद सकट याने आणखी काही गुन्हे केले आहेत का याची चौकशी बोरगाव पोलीस स्टेशनचे स.पो.नि संतोष चौधरी करत आहेत.

No comments

Powered by Blogger.