Your Own Digital Platform

चैतन्य पतसंस्थेच्या ठेवीदारांचे 15 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणवडूज :
येथील चैतन्य ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था यांच्याकडून पैसे देण्यास टाळाटाळ करण्याऱ्या व त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करावी, या मागणीसाठी दि. 15 ऑगस्टला उपोषण करण्याचा इशारा ठेवीदारांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत निवेदनात म्हटले आहे की, चैतन्य पतसंस्थेत आमच्या लाखो रुपयांच्या ठेवी अनेक वर्षे आहेत. दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीच्या अंमलबजावणीपासून पतसंस्थेने ठेवीदारांनी मागणी केल्यानंतर ठेवींच्या रक्कमा परत देण्यास नकार देण्यास सुरुवात केली. चेअरमन संजय इनामदार, ज्योती इनामदार, कांचन इनामदार, संतोष इनामदार, व्यवस्थापक शैलेश देशपांडे, प्रसाद इनामदार तसेच सर्व संचालक व कर्मचारी वर्ग यांनी ठेवींच्या रक्कमेची अफरातफर केली असून यासंदर्भात दोन वेळा निवेदने देऊनही सहकार खात्यामार्फत कोणतीही कारवाई केली गेली नाही.

 तसेच वडूज पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी देवूनही चेअरमन, संचालक मंडख व कर्मचारी यांच्यावरील तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
त्यामुळे ठेवींचे पैसे टाळाटाळ करणाऱ्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी 15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा निवेदनाद्वारे दिला आहे.