अकराशे ग्रामपंचायतीची 26 सप्टेंबरला निवडणूक
मुंबई : राज्यातील विविध 26 जिल्ह्यांमधील 1 हजार 41 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 69 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी 26 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज केली.सातारा जिल्ह्यातील 49 ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे.

ऑक्‍टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हे मतदान होत आहे. यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 5 ते 11 सप्टेंबर या कालावधीत स्वीकारले जातील. त्यांची छाणनी 12 सप्टेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 15 सप्टेंबरपर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल.

मतदान 26 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 27 सप्टेंबर रोजी होईल, असे सहारिया यांनी सांगितले.ख्या पुढीलप्रमाणे :ठाणे-6, रायगड-121, रत्नागिरी-19, सिंधुदुर्ग-4, नाशिक-24, धुळे-83, जळगाव-6, अहमदगनर-70, नंदुरबार-66, पुणे-59, सोलापूर-61, सातारा-49, सांगली-3, कोल्हापूर-18, बीड-2, नांदेड-13, उस्मानाबाद-4, लातूर-3, अकोला-3, यवतमाळ-3, बुलडाणा-3, नागपूर-381, वर्धा-15, चंद्रपूर-15, भंडारा-5 आणि गडचिरोली-5.

पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा : ठाणे-4, रायगड-3, सिंधुदुर्ग-1, नाशिक-8, धुळे-2, जळगाव-1, पुणे-6, सातारा-3, सांगली-10, उस्मानाबाद-1, जालना-2, यवतमाळ-3, वाशीम-6, बुलडाणा-2, नागपूर-1, चंद्रपूर-2 आणि गडचिरोली-14.

No comments

Powered by Blogger.