Your Own Digital Platform

जिल्ह्यात 29 लाख 73 हजार वृक्ष लागवड


सातारा : शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवडी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी 1 जुलै ते 31 जुलै या कालावधी 23 लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्यातील नागरिकांच्या सहभागातून 29 लाख 73 हजार रोपे लावगड करण्यात आली आहेत, म्हणजे 6 लाख 29 हजार एवढे अधिक असल्याची माहिती उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली आहे.

यामध्ये वन विभागाने 15 लाख 96 हजार, सामाजिक वनीकरण 3 लाख 92 हजार, जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमार्फत 3 लाख 78 हजार व इतरशासकीय यंत्रणांकडून 2 लाख 8 हजार, जिल्हा रेशमी अधिकारी कार्यालय 2 लाख 58 हजार 500, शिक्षण विभाग 18 हजार 550, गृह विभाग व जेल8 हजार 401, कृषी विभाग 19 हजार 67, मुस्लीम जमात संघ 500, आर्ट ऑफ लिव्हिंग 55 हजार, कमिन्स उद्योग 6 हजार 524, तनिष्का ग्रुप524, सहयाद्री साखर कारखाना 3 हजार, खासगी संस्था 65 हजार, अशासकीय व शासकीय इतर यंत्रणा 2 लाख 70 हजार, माय प्लांट मोबाईल ×प व रोपे आपल्या दारी द्वारे 5 हजार असे एकूण 29 लाख 73 हजार रोपे सातारा जिल्ह्यात जुलै 2018 अखेर लागवड करण्यात आली आहेत.

सन 2019 साठीच्या पावसाळ्यासाठी 33 कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यासाठी 33 लाख 22 हजार रोपे लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी नागरिकांचा मिळणारा उत्फुईलर्त प्रतिसाद पाहता 33 लाख 22 हजार वृक्ष लागवड कार्यक्रमही यशस्वी होईल,असा विश्वासही श्री. अंनजकर यांनी व्यक्त केला आहे.

वृक्ष लागवड करुन ही चळवळ थांबविण्यात येणार नसून दर तीन महिन्यांनी लागवड केलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धनाच्या दृष्टीने आवश्‍यक तोपाठपुरावा करण्यात येणार आहे व वृक्ष संगोपानामध्ये येणाऱ्या त्रुटी दूर करुन जास्तीत जास्त रोपे जगवण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे, असेही श्री. अंजनकर यांनी सांगितले आहे.